• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीला कट लागल्याने बसचालकाला जबर मारहाण !

editor desk by editor desk
November 28, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

धरणगाव : प्रतिनिधी

युवतीच्या दुचाकीला बसचा कट लागल्याने बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास लाथाबुक्क्यांसह चापटांनी बेदम मारहाण केल्याची घटना २७ च्या सायंकाळी नांदेड येथे गावठाण चौकात घडली. दरम्यान, बसचालकाची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून नांदेडला सायंकाळी चार वाजता येणारी बस (एमएच-१४/बीटी-३०१९) ही चार वाजेच्या सुमारास नांदेडला आल्यानंतर नारणे गावाकडे जाते. ही बस नारण्याहून नांदेडकडे येत असताना नम्रता महेंद्र पाटील (२०) हिच्या दुचाकीला बसने कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व नम्रता पाटील हिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. बस गावात आल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी बसचालक तुकाराम आनंदराव रायसिंग (४६, बांभोरी) यांना बेदम मारहाण केलीबसचालक गंभीर अवस्थेतच साडेचार वाजेपासून सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत बसच्या सीटवर पडून होते. दरम्यान, ही घटना नांदेड येथील रहिवासी व गोंदिया पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे हे गावी सुटीवर आले असल्याने त्यांना समजताच त्यांनी स्वतःच्या वाहनातून बसचालकास धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

बसचालकास बेदम मारहाण झाल्याची घटना गावात समजल्यानंतर गावठाण चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक करीम सैयद यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. नम्रता महेंद्र पाटील (२०) हिच्या फिर्यादीवरून पोलिसात तुकाराम रायसिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Previous Post

पाऊस सुरु असतानाही देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरूच !

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group