प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील समस्त पाटील समाज पंच मंडळाचे संचालक नवल पाटील यांचे सुपुत्र प्रमोद पाटील यांची आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्मी जवान प्रमोद पाटील यांनी त्यांची ९ महिन्यांची ट्रेनिंग बंगळुरू (कर्नाटक) येथे पूर्ण केली. प्रमोदची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे झालेली असून देशसेवेसाठी ते आज रवाना होत आहेत. त्यांचे वडील नवल पाटील यांनी अतिशय कष्टमय जीवनाच्या संघर्षमय प्रवासातून प्रमोदची जडणघडण केली. रसवंती, सेंटिग काम, शेतीची कामे अशी अनेक कष्टाची कामे करून हलाखीच्या परिस्थितीत वडिलांनी मुलाला शिक्षण दिले. मुलाने देखील आई – वडिलांच्या कष्टाचे चीज केले आणि सैन्यात भरती होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले. भारत देशाच्या रक्षणासाठी प्रमोद जम्मू काश्मीर येथे सेवेत रुजू होतोय.
ही खऱ्या अर्थाने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग आणि जॉइनिंग यामध्ये मिळालेल्या कालावधीत प्रमोद घरी आला असता, आज मित्र परिवाराच्या वतीने त्याचा पुष्पहार, गुलाबपुष्प व शिवचरित्र देऊन सन्मान करण्यात आला. जवान प्रमोद पाटील च्या सत्कार प्रसंगी तरुण भारत चे पत्रकार कडू महाजन, नपा गटनेते विनय (पप्पू) भावे, समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, जागृती मंडळाचे माजी अध्यक्ष आनंदराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे फाऊंडर सभासद गोपाल पाटील, कॉन्ट्रॅक्टर प्रशांत देशमुख, भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते भिका मराठे, लक्ष्मण पाटील सर, मच्छिंद्र पाटील, प्रफुल पवार, अतुल मराठे, जगदीश चौधरी