Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा : शेतकरी हवालदिल !
    जळगाव

    अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा : शेतकरी हवालदिल !

    editor deskBy editor deskNovember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यभरात अनेक ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

    विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रात्री एक वाजता अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

    मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात जोरदार, मुंबईसह कोकणातील सर्व ७ + खान्देशसह मध्य महाराष्ट्रातील १० अशा १७ जिल्ह्यात मध्यम, पावसाची शक्यता जाणवते. विदर्भातील सर्व ११ (विशेषतः अकोला, बुलढाणा, वाशिम) व मराठवाड्यातील ६ जिल्हे (छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेड) अशा एकूण १७ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.