Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन भीषण अपघातात ६ ठार तर ४ गंभीर जखमी !
    क्राईम

    दोन भीषण अपघातात ६ ठार तर ४ गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskNovember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनमाडनजीक रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ६ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मनमाड-येवला मार्गावर कंटेनर आणि स्वीफ्ट कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये स्वीफ्ट गाडीतील मधील नाशिकच्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ कंटेनर कारवर उलटून झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दोन अपघात झाले. मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंडीजवळ कंटेनर (क्रमांक आर. जे. १४ जी.पी. ३४३५) आणि कार (क्रमांक एम. एच. १२ एम. डबल्यू ०९१८) यांच्यात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघात मोठा विचित्र होता. समोरून भरधाव वेगात येणारा कंटेनर कारवर कलंडल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला, तर चौघेजण जखमी झाले, जखमींमध्ये किरण मोरे नामक क्रीडाशिक्षकाचा समावेश आहे. कारमधील सर्व पुण्याचे रहिवाशी असून उज्जैन येथून महाकाल दर्शन करून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

    दुसऱ्या घटनेत सायंकाळच्या दरम्यान मनमाड येवला मार्गावर अनकवाडे गावाच्या पुढे रेल्वे पुलावर कंटेनर आणि स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. कंटेनर (क्रमांक एच. आर. ३८ ए. सी. ७०६१) आणि स्वीफ्ट कार (क्रमांक एम.एच. ०६ ए. एन. ८८९०) यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. श्रेयस धनवटे, गणेश सोनवणे, ललित सोनवणे, रोहित धनवटे, प्रतीक नाईक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण नाशिक येथील रहिवासी आहेत. मनमाडजवळच्या कुंदलगाव म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम आटोपून येवलामार्गे नाशिककडे परतत असतांना हा अपघात झाला. यातील ललित गणेश शरद सोनवणे हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.