जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आकाशवाणी चौकासह एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबवणाऱ्या राहुल गणेश महाजन (वय-२०) रा. तांबापुरा व सोमनाथ भागवत अहिरे (रा. कुसुंबा) या दोघ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दुचाकीच्या दुचाकींसह मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामानंद नगर व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आकाशवाणी चौक परिसरात राहणारे भाऊसाहेब दादाजी बागुल हे दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जवळ दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित राहुल महाजन हा घेऊन जात असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने कारवाई करीत चोरट्याला अटक करीत दुचाकी हस्तगत केली.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व रामानंद नगरच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे यांच्यासह पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोना हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, विजय जाधव यांच्या पथकाने केली.