नंदुरबार : वृत्तसंस्था
भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नवापूर ते बोकरझर गावादरम्यान घडली. याबाबत पीक चालकाविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवजान गावित हा त्याची दुचाकीने (क्रमांक एमएच ३९ आर २७१२) नवापूरकडून बोकड़झर गावाकडे जात असताना समोरून आलेल्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच १८ एम ९८२१) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दिवज्ञान हा फेकला गेल्याने त्याला गंभीर मार लागला त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुरेश रुपजी गावित, रा. बोरझर यांनी फिर्याद दिल्याने पिकअप चालक देवीदास पंडित कोठावदे (६१) रा. पिंपळनेर, ता. साक्री याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे करीत आहे.