पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. हि गाडी घाटातून खाली गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातून गाडी जाताना वारवंड गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या गाडीत काही प्रवाशी होते. या गाडीतले २ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र यामध्ये चारचाकी गाडीचे मोठं नुकसान झाले आहे.