धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील N S S व रोव्हर रेंजर तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पाजली वाहन्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.बी.एल. खोंडे यांचा हस्ते माल्यर्पण करण्यात आले. वरिष्ठ शिक्षक प्रा.डी.डी. पाटील, प्रा.ए.आर. पाटील, प्रा.एस.आर. पाटील, प्रा. एम. एस. कांडेलकर, माजी N S S कार्यक्रम प्रमुख प्रा.आर.जे. पाटील मॅडम, प्रा. अमित बागुल, प्रा.एन.डी. सोनवणे, प्रा.व्ही टी. बिराजदार, सौरभ डहाडे आदी नी गुलाब पुष्प वाहिली. N S S विभाग तर्फे कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.सी. साळवे, सहाय्यक कार्यक्रम अधीकारी प्रा.एस.झेड. पाटील, प्रा.यू.व्ही. पाटील, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.बी. बिरारी मॅडम यांनी देखील गुलाब पुष्प वाहिली.
रोव्हर रेंजर तर्फे प्रा.डॉ.पी.बी. सोनवणे, प्रा.आर.पी. चौधरी मॅडम यांनी पुष्पाजली वाहिली. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांनी देखील पुष्पाजली वाहिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनातील विविध प्रसंगाची माहिती प्रा.बी.एल. खोंडे यांनी विदयार्थीसमोर दिली व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून यांचे विचार आत्मसात करावेत तसेच बाबासाहेबांचे साहित्य वाचन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच N S S व रोव्हर रेंजरच्या विद्यार्थांनी परिश्रम घेतले. अभिवादन करण्यासाठी विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.