जळगाव : प्रतिनिधी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दि. ६ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्त नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान तीन विशेष गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या दरम्यान सहा विशेष गाड्या. तर अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एक विशेष गाडी असेल. क्र. ०१२६२ ही गाडी नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी ११:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ३:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ ही गाडी दि.५ डिसेंबर रोजी नागपूर येथून ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दिवशी ११:४५ वाजता
त्या पोहोचेल. क्र. ०१२६६ ही विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथून ३:५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०:५५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर इथे थांबे असतील. तसेच क्र. ०१२४९ ही गाडी ६ डिसेंबर रोजी ४:४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ९:३० पोहोचेल. तर क्र. ०१२५१ ही गाडी दि.६ डिसेंबर रोजी ६:३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०:३० वाजता पोहोचेल. क्र. ०१२५३ ही गाडी ७ डिसेंबर रोजी दादर येथून मध्यरात्री पाउन वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी दुपारी ३:५५ वाजता पोहोचेल.