Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीला नडला लग्नाचा हट्ट अन त्याने केले ३१ तुकडे !
    क्राईम

    तरुणीला नडला लग्नाचा हट्ट अन त्याने केले ३१ तुकडे !

    editor deskBy editor deskNovember 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    एका तरुणीच्या प्रियकराने तिची क्रूरपणे हत्या केलीये. हत्या केल्यावर नराधमाने तिच्या शरीराचे तब्बल ३१ तुकडे केले आहेत. हि घटना ओडिसा येथे घडली आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून गेलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २२ वर्षांची तरुणी बुधवारी आपल्या आईबाबांना सांगून घरातून बाहेर पडली. रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. मुलीचा काहीच तपास लागत नसल्याने शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरंगपूर जिल्ह्यातील जंगलात शोधकार्यात तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या मृतदेहाचे ३१ तुकडे करून जमिनीत पुरण्यात आले होते. पोलिसांनी हे सर्व तुकडे बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तरुणीची हत्या नेमकी केव्हा झाली. तिला जमिनीत केव्हा पुरण्यात आलं या सर्वांची महिती रिपोर्ट आल्यानंतर समजेल.

    पोलीस चौकशीत पुढे अशी माहिती समोर आली की, तरुणीचे ज्या मुलावर प्रेम होते त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. आरोपीने सुरुवातीला तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचले. नंतर तिने लग्नासाठी हट्ट केल्यावर त्याने तिला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणीला याचा नकार होता. लग्नाचा हट्ट घेऊन तरुणी थेट तरुणाच्या घरी पोहचली होती. घरी आल्यावर तिने पाहिले की तिच्या प्रियकराचे आधिच लग्न झाले होते. तसेच त्याला ५ मुलंही आहेत. मात्र तरीही तरुणीने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. संतापात प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तरुणीवर वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी आता प्रियकर आणि त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलंय.

    #criem
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्स तपास सुरू, सत्य उघड होण्याची घडी

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.