बीड : वृत्तसंस्था
रस्त्यावर थांबलेल्या एका ओळखीच्या महिलेला दुचाकीवर लिफ्ट दिली. त्यानंतर तिला घरी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार बीड शहरात २० नोव्हेंबरला घडला. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला शिवाजीनगर ठाण्यात आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयावर हनुमान श्रीराम कयवाडे हे कर्तव्यावर असून बीड शहरातील पिडीता हि आपल्या मुलीला दिवाळीच्या सुट्टया असल्याने माहेरी गेली होती. २० नोव्हेंबरला सायंकाळी तिच्या भावाने तिला मंजिरी फाटा येथे सोडले. संसारोपयोगी साहित्य खरेदी करायचे असल्याने पीडिता बीडला येत होती. फाट्यावरून रिक्षाने ती बीडला आली. परंतु, बार्शी नाका परिसरात रिक्षा खराब झाली. त्यामुळे ती खाली उतरली. दुसऱ्या रिक्षाची वाट पाहत असतानाच कयवाडे हा गावातीलच आणि ओळखीचा असल्याने त्याच्या दुचाकीवर बसली. परंतु, त्याने बाजारपेठेत न सोडता नगर रोडने त्याच्या बीडमधील अंकुशनगर भागातील घरी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला.