• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेरात विचित्र अपघात : तीन ठार तर तीन जखमी !

editor desk by editor desk
November 25, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
जामनेरात विचित्र अपघात : तीन ठार तर तीन जखमी !

जामनेर : प्रतिनिधी 

शहरानजीक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अनोळखी वाहनाने तीन वाहनांना कट मारीत विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एका मुख्यध्यापकासह दोन जणांचा दुर्देवी मृत्यू तर तीन जण जखमी असल्याची झाल्याची माहिती समोर येत आहे. हि घटना जामनेर- बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हेही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. या भीषण घटनेनंतर अपघातातील एका दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली.

याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचेदेखील नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली. यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत. ते पुण्याहून घाणखेडकडे (ता. बोदवड) निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहोचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती. जामनेर येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (वय ४२), सुनील शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Previous Post

१२ टायर मालवाहू वाहन मध्यरात्री पेटून खाक !

Next Post

१२ किलोमीटर पोलिसांनी केला पाठलाग : डीझेल चोरीप्रकरणी १ अटकेत

Next Post
१२ किलोमीटर पोलिसांनी केला पाठलाग : डीझेल चोरीप्रकरणी १ अटकेत

१२ किलोमीटर पोलिसांनी केला पाठलाग : डीझेल चोरीप्रकरणी १ अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group