पुणे : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील आळेफाटा येथे १२ टायर मालवाहू वाहन आगीत जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. मात्र अग्निशमन वाहन जुन्नर हुन आळेफाटा ला पोहोचेपर्यंत मालवाहू ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता. तसेच या ट्रक ला आग नेमकी कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील सुर्यकांत शिंदे यांनी आपली एम.एच.१४ ई.एम.९५२७ हि १२टायर मालवाहतुक गाडी गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास ओतुर रोडवर असलेल्या राजू बेळगावकर यांच्या गॅरेजमध्ये लावुन घरी गेले होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे गाडी ने पेट घेतल्याने जवळच गॅरेज मध्ये झोपलेल्या कामगारांना जाग आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले. दरम्यान आळेफाटा हे पुणे- नाशिक व नगर -कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गांला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असुन या ठिकाणी वहानांची मोठ्या दररोज प्रमाणावर खरेदी विक्री होत असते.