नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना एक अशीच घटना ओडिशामधून समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केली आहे. नराधम पतीने यावेळी आपल्या पोटच्या लेकीचाही जीव घेतला आहे. मुलगी आणि पत्नी झोपलेली असताना त्याने घरात साप सोडला आणि सर्पदंशामुळे माय लेकीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील गंजाम जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झालाय. दुपरी बराच वेळी महिलेने घराचे दार उघडले नाही त्यामुळे शेजारच्या व्यक्तींना काहीतरी चुकीचे घडल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांना याबाबत माहिती मिळातच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घरात आल्यावर पोलिसांना महिला आणि तिची मुलगी या दोघींचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यावर त्यात दोघींनाही सर्पदंश झाल्याची माहिती मिळाली. महिलेचा आणि मुलीचा मृत्यू साप चावल्याने झाल्याचे समजले तरी पोलिसांच्या मनात वेगळाच संशय होता. त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच महिलेच्या पतीची चौकशी सुरू केली. सुरूवातीला पतीने आपण काहीच केलं नसल्याचा बनाव दाखवला. नंतर त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.