ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील अल्पवयीन मुलासह मुलीसोबत गेल्या काही वर्षापासून अनेक संतापजनक घटना घडत आहे. नुकतेच ठाण्याजवळील कळवा परिसरात एका १७ वर्षीय मुलाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याजवळील कळवा परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने आरोपीकडून ३०० रुपये उधार घेतले होते. तेच पैसे परत न केल्याने आरोपी तौसिफ खानबांडे आणि समील खानबांडे यांनी त्या मुलाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याचे इअरफोन घेतले. त्यानंतर त्याला एके ठिकाणी धक्काबुक्की आणि लाथा घालत मारहाण केली. मारहाणीत पीडित मुलाच्या पायाला दुखापत झाली आहे.