Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुभाजकावर कार आदळल्याने दोघांचा मृत्यू, एक जखमी
    क्राईम

    दुभाजकावर कार आदळल्याने दोघांचा मृत्यू, एक जखमी

    editor deskBy editor deskNovember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी आपले काम आटोपून कारने परतीचा प्रवास सुरु केला. गुजरातकडे जाताना तालुक्यातील सारर्वे गावाजवळ आर्टिका कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गुजरात राज्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना २१ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील बडोदा येथील कार चालक अजय नरेंद्र कोकजे (वय ६२), तसेच आनंद जिल्ह्यातील अकलाव तालुक्यातील भानपुरा येथील चेतन ताखासिंग राज (वय २७) व तखासिंग उदयसिंग राज (वय ६०) हे आपल्या खासगी आर्टीगा कार (जीजे २३, सीई- ३६११) ने २० रोजी आले होते. कंपनीचे काम संपवून ते तिघे २१ रोजी पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले. पारोळा तालुक्यातील सारर्वे गावानजीक नॅशनल हायवे क्रमांक सहावरुन पहाटे ३ वाजेच्या सुमारास जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने आर्टिका कार भरधाव वेगाने रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला, तर तखासिंग उदयसिंग राज हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या वेळी घटनास्थळी गावातील काही लोकांनी धाव घेतली. तर रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, यश ठाकूर, अमोल महाजन, शरद पाटील, यश गोसावी यांनी मृतदेह व जखमीला गाडीतून बाहेर काढले. जखमीला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या वेळी त्यांच्या अंगावर असलेले सोन्याची चैन रुग्णवाहिका चालक इश्वर ठाकूर व शरद पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकांना परत केली. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर कार इतक्या जोराने आदळली की, यात गाडीची दोन्ही एअर बॅग उघडूनही दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. याबाबत पारोळा पोलिसात श्रीरंग अजय कोकजे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिवसाढवळ्याची हत्या; नवऱ्यासह बायकोने बॉयफ्रेंडला संपवलं !

    March 5, 2026

    सरपंच‑उपसरपंचांवर राजकीय कट; पिकअप गाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न !

    March 5, 2026

    बसस्थानकावर पोलिसाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा, चालकाला मारहाण

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.