फैजपूर : प्रतिनिधी
शहरातील गजानन वाडी या भागात वडिलोपार्जित मालमत्तेच्या हिस्से वाटणीवरून सून आणि मुलाने वृद्ध आईला मारहाण करीत तिच्या डाव्या हातावर सुरीने दुखापत केली. ही घटना दि. १८ रोजी घडली. या घटनेप्रकरणी मंगलाबाई मुरलीधर भावसार (वय ७५) यांनी मुलगा दिलीप भावसार आणि सून शैलजा दिलीप भावसार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील गजानन वाडी भागात राहणाऱ्या मंगलाबाई मुरलीधर भावसार यांच मुलगा दिलीप आणि सून शैलजा यांन वडिलोपार्जित मालमत्तेच्य वाटणीवरून आईला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलाने आईच्य डाव्या हातावर सुरीने दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमर्क दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्ह दाखल करण्यात आला आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहेत.