Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीस कर्मचाऱ्याने चोरली महिलेची सोनसाखळी !
    क्राईम

    पोलीस कर्मचाऱ्याने चोरली महिलेची सोनसाखळी !

    editor deskBy editor deskNovember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात सराईत चाेरटे चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडत आहे अशातच नाशिक शहरात चक्क एका पाेलीस शिपायाने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दाेनने संशयित पाेलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील त्र्यंबक राेडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला १२ नाेव्हेंबर २०२३ राेजी पायी जात असतांना याेगेश लाेंढे हा पाेलीस कर्मचारी त्याच्या 17 वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन तेथे आला. यानंतर त्याने या महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केला.

    काही दिसवाने लाेंढे व त्याच्या अल्पवयीन मित्र नशेत असताना मतभेद झाले. हे वाद पराकाेटीला पाेहाेचत असताना अल्पवयीन मुलाने पाेलिसांना घटनेची माहिती कळवून प्रकार सांगितला. यानंतर सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर व पथक घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली असतानाच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दाेनचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांना संशयिताची माहिती समजली. त्यांच्या सूचनेने पथकाने संशयित लाेंढे यास काही वेळातच ताब्यात घेतले. चाैकशी केली असता ताे पाेलिस शिपाई असल्याचे समाेर आले. दरम्यान, सरकारवाडा पाेलिसांत चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.