पुणे : वृत्तसंस्था
राज्यात नेहमीच विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना पुण्यातील बालसुधारगृहात घडली आहे. तीन कुख्यात आरोपींनी एका अल्पवयीन मुलावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील मिरजगाव येथील अल्पवयीन मुलावर तिघा कुख्यात आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगा हा आहे. याच बालसुधारगृहातील इतर तीन आरोपींनी या मुलावर लैंगिक अत्याचार केला. सुधारगृहातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करणारे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यांत सध्या बालसुधारगृहात आहेत. या आरोपींविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.