Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
    क्राईम

    नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच

    editor deskBy editor deskNovember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    भारतीय लष्करात सुभेदारपदासाठी सकारात्मक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका उमेदवाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. संजू अर्लाकट्टी असे या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून, तो नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात कार्यरत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करातील भरतीसाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी मुंबईत भारतील नौदलाच्या आयएनएस अश्विनी या रुग्णालयात अलीकडेच झाली. यावेळी लष्कराच्या डॉक्टरांना संजू अर्लाकट्टी हा नौदलाचा अधिकारी साहाय्य करत होता. या प्रकरणातील तक्रारदार उमेदवाराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याला दुसऱ्या इमारतीमध्ये एका शौचालयामध्ये नेत, जर वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण असा अहवाल हवा असेल तर मला ३० हजार रुपये दे असे सांगितले. संबंधित उमेदवाराने हे पैसे देण्यासाठी असमर्थता व्यक्त केली होती. मात्र, रात्रीपर्यंत विचार कर, मी तुला पुन्हा फोन करेन असे त्या अधिकाऱ्याने संबंधित उमेदवाराला सांगितले. त्याप्रमाणे अधिकाऱ्याने फोन केला व फोन-पेवर पैसे पाठविण्यास सांगितले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.