Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिवाळीच्या सुट्टीत गावी गेले अन घरात चोरट्यांनी केली चोरी !
    क्राईम

    दिवाळीच्या सुट्टीत गावी गेले अन घरात चोरट्यांनी केली चोरी !

    editor deskBy editor deskNovember 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. त्यांच्या घरातील ड्रॉवरचे लॉक तोडून चोरट्यांनी २० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्कमध्ये गणपत व्यंकटराव धुमाळे (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळी निमित्त गणपत धुमाळे हे दि. १० नोव्हेंबर रोजी परिवारासह मुळगावी लोणी ता. देगलूर जि. नांदेड येथे घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कूलप तोडून आत प्रवेश करत घरातील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले २० हजारांची रोकड चोरून नेली. शेजारच्यांच्या लक्षात आली घटना गणपत धुमाळे यांच्या शेजारी राहणारे रमेश बोरसे यांना गणपत धुमाळे यांच्या घराचे दरवाजावरील लॉक तुटलेले दिसले. त्यानुसार घरात चोरी झाल्याबाबत धुमाळे यांना कळविले. त्यानंतर धुमाळे हे दि. १९ नोव्हेंबर रोजी घरी आले तेव्हा घरात सर्व सामान पसरलेला दिसून आला. टेबल्याच्या ड्रॉव्हरमधून २० हजार रूपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. धुमाळे यांनी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.