• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया ; गुलाबराव देवकर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 4, 2021
in जळगाव, राजकारण
0
पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया ; गुलाबराव देवकर

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी “पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया” असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

“गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात फिरतोय आणि त्याचे फलित म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला विजय झाला.असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने आपलं कार्य केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण काम करू या.अधिक चांगल्या पद्धतीने ‘शेतकरी बँक’ म्हणून ओळखली जाणारी मध्यवर्ती सहकारी बँक यासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करून आपण ही परंपरा पुढे घेऊन जाऊ या.” असा आशावाद व्यक्त करत त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने तालुका व जिल्हास्तरावर रक्तदान शिबीर. आरोग्य शिबीर सारखे विविध कार्यक्रम करावेत” असे त्यांनी आवाहन केले.

पुढे ते म्हणाले, “महिनाभरापासून जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू होती. सर्व तालुक्यांनी तालुकानिहाय चांगल्या पद्धतीने काम केलं. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही वन साईड झाली. आपले जवळजवळ सर्व उमेदवार निवडून आले. रवींद्र भैय्या, नाथाभाऊ, सतीश अण्णा आणि आम्ही सर्व प्रमुख मंडळींच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने बारकाईने नियोजन केले. यामुळे जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या फरकाने आपण विजय प्राप्त केला. या निवडणुकीत विजयामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. पहिल्याच निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांने एकत्र पाऊल टाकले हे यश त्याचं फळ आहे. भविष्यातही याच पद्धतीने आपण प्रयत्न केला तर निश्चित चांगल्या पद्धतीने वातावरण या जिल्ह्यात निर्माण होईल. पुढे पंचायतीच्या, जिल्हा परिषदेच्या, मार्केट कमिटीच्या निवडणुका आहेत. या विविध निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जांच्या गावातल्या निवडणुका असतील त्यांनी त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. तिथे आपण निवडून येण्याचा प्रयत्न करायला हवा. मार्केट कमिटी किंवा इतर विकास संस्था हे गावाचे बलस्थान असते त्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा आपल्या पुढे चांगला उपयोग होऊ शकतो” असे म्हणत पुढच्या निवडणुकांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुढे व्यक्त होतांना ते म्हणाले, “नाथाभाऊ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिरिष चौधरी, अध्यक्ष भैयासाहेब सर्व मंडळींनी एकत्र निर्णय घेऊन मला या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण करण्यास प्रयत्नशील राहील. जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागच्या पाच सहा वर्षांमध्ये संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालं असून यापूर्वी झालेल्या सर्व चांगल्या पदाधिकारींच्या चांगल्या कामाची प्रेरणा घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करू” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आणि शुभेच्छा बद्दल सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महिला आघाडीच्या मंगला पाटील, अक्षय करकरे, जिल्ह्याचे अध्यक्ष अॅड.सचिन पाटील, विनोद देशमुख, सुनील माळी, राजू पाटील, अशोक पाटील यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Previous Post

मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

Next Post

ग्रामपंचायत सदस्या अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post
ग्रामपंचायत सदस्या अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ग्रामपंचायत सदस्या अपात्र : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group