जळगाव ;-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या वतीने विद्यापीठातील त्यावेळच्या तौलनिक भाषा विभागाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमयी वर्षानिमित्त अकरा दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन प्रशाळेच्या हिंदी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेची सुरुवात रविवार दिनांक १५ऑगस्टला होईल तर समारोप बुधवार दिनांक २५ ऑगस्टला होईल. झूम मिटींग ॲप वर दररोज सकाळी १०.३० ते १२.०० वाजेपर्यं व्याख्यान होणार असून या व्याख्यानमालेचे थेट प्रक्षेपण युटयुब वर प्रक्षेपित होईल. सलग चालणाऱ्या या व्याख्यानमालेत मा. डॉ. विश्वास पाटील, शहादा रामचरितमास: एक परिक्रमा, डॉ. श्रीराम परीहार, खंडवा, मध्य प्रदेश मानवीय मूल्यों की धरोहर डॉ.तेजपाल चौधरी, डॉ. दामोदर खडसे, पुणे सृजन एवं अनुवाद लेखन, डॉ. ओमप्रकाश शर्मा, पुणे डॉ. तेजपाल चौधरी के उपन्यासों में गांधीवाद, डॉ. घनश्याम अग्रवाल, अकोला कविता एवं लघु कविता, डॉ. भारती गोरे, औरंगाबाद हिंदी कविता में स्त्री, डॉ. दिनेश चमोला (शैलेश) देहरादून, उत्तराखंड सृजन यात्रा और साहित्य के सरोकार, सुधीर ओखदे, आकाशवाणी, जळगाव संस्मरणों के दायरे में तेजपाल चौधरी, डॉ. सुभाष महाले, जळगाव डॉ.तेजपाल चौधरी: वाणी और वर्तन के शुची पुरुष, प्रो. रवीरंजन, हैदराबाद भक्ति काव्य: भावभूमि और विचार भूमि, प्रो. दिनेश चौबे, नेहू, शिलाँग भारतीय परिप्रेक्ष्य में तुलनात्मक साहित्य इ. विषयावर संपूर्ण भारतातील मान्यवरांचे विचार एकाच मंचावर ऐकता येणार आहे. ही व्याख्यानमाला रोज सकाळी साडे दहा ते बारा या वेळेत ऑनलाईन होणार असून राष्ट्रीय स्तरावरील वक्ते वेगवेगळ्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्यांच्या मार्गदर्शना अगोदर रोज स्व. डॉ. तेजपाल चौधरी यांच्या संबंधातील संस्मरण देखील सांगणार आहेत. त्यात डॉ. ए. बी. पाटील, डॉ. मधु खराटे, डॉ. कृष्णा पोतदार, डॉ. उर्मिला पाटील, डॉ. उषा शर्मा, डॉ. रोशनी पवार, डॉ. मालती जावळे, रश्मी पुणतांबेकर, प्रा. रफिक तडवी, प्रा. विजय लोहार, डॉ. योगेश पाटील यांचा सहभाग असणार आहे. व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालक प्रो. मुक्ता महाजन, हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी, संयोजक डॉ. प्रिती सोनी, प्रा. मनीषा महाजन व प्रा. तुषार सोनवणे यांनी केले आहे.