नाशिक : वृत्तसंस्था
अनेक जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील पाथर्डीगाव परिसरातील सुखदेवनगर भागात दारूच्या नशेत एकाने इमारतीच्या गच्चीतून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. जगदिश नारायण नेरपगार (५० रा.दत्तमंदिराजवळ, सुखदेवनगर दाढेगावरोड पाथर्डी गाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी गाव येथील सुखदेवनगरातील रहिवासी जगदिश नारायण नेरपगार यांना दारूचे व्यसन असून रविवारी दुपारी मद्याच्या नशेत त्यांनी अज्ञात कारणातून राहत्या घराच्या गच्चीतून उडी घेतली होती.या घटनेत त्यांच्या डोक्यास व उजव्या हातास दुखापत झाल्याने त्यांना मुलगा मयूर नेरपगार यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. संघ गुप्ता यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.