नाशिक : वृत्तसंस्था
देशभर दिवाळी साजरी होत असतांना अभिनेता सलमान खानचा टायगर ३ हा सिनेमा सुरू असताना काही इस्मानी चित्रपटगृहामध्ये फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मालेगाव मध्ये घडला होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर-३ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे पडद्यावर आगमन होताच चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजी केली. अचानक फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरून पळापळ झाली.
पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला. यानंतर चित्रपटगृह मालकाने त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यातील तीन आरोपीना छावणी पोलिसांनी अटक केली असून आज त्या आरोपीना तपास व चौकशी कामी मोहन चित्रपट गृहात नेण्यात आले होते.



