धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील विनोद जवरीलाल पाटील हे हवालदार या पदावर अभिमानाने देश सेवेचे काम करीत असतांना ते दि. १७ नोव्हेबर २०२३ शुक्रवार रोजी कर्तव्यावर असतांना शहीद झाले. त्यांच्यावर रोटवद येथील मूळगावी शासकीय इतममात रोटवद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हे ८ ऑगस्ट २००२ रोजी ते सेनेत भर्ती झाले होते. तर दीड ते दोन वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त ही झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जात असताना काल दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी शुक्रवार आकस्मित निधन झाले. आज सकाळी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांना सायं 6 वाजता कळविण्यात आले. ते अवघे वय 41 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुल, व एक भाऊ आहे. परवा त्यांचे लहान मुलांशी फोनवर संभाषण झाले होते. वडिलांनी ही व्हिडीओ कॉलद्वारे कर्तव्यावर असल्याचे त्यांनी दाखविले.
त्याठिकाणी खूप थंडी असल्याचे ते बोलत होते. विनोद पाटील यांचे वडील रोटवद ता.धरणगाव येथे शेती करतात. खूप हाल अपेष्टा सोसून मुलाला त्यांनी मुलाला सैन्यात भरती केले होते. अशी माहिती त्यांचा भाऊ प्रमोद पाटील यांनी दिली. त्यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.आज रात्री अहमदाबाद येथुन त्यांचे पार्थिव आणण्यात येईल. उद्या सकाळी १९ नोव्हेबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय इतममात त्यांच्या पार्थिवावर रोटवद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण रोटवद परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


