धरणगाव : प्रतिनिधी
देशात सुरु असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण धरणगावातील स्व.सलीमभाई पटेल यांच्या कार्यालयाजवळ येथे दुपारी २ वाजेपासून सुरु होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव शिवसेनेच्या शाखेतर्फे आयोजित करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. हा सामना धरणगावकरांनी सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी आयोजन केले आहे. रविवारी, १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे. क्रिकेट प्रेमींनी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


