Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावठी कट्टा, कडतुस ,तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक !
    क्राईम

    गावठी कट्टा, कडतुस ,तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 4, 2021Updated:December 4, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी राजेंद्र पाटील : बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा, तीन जिवंत काडतुस व तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी बिबा नगर येथून शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अटक करत त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचा कट्टा व तलवार हस्तगत केली आहे, याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिबा नगर परिसरात एक तरूण बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा, कडतुस आणि तलवार बाळगत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार जोशी, संजय भालेराव, दिनेश पाटील, अशोक महाले, महिला पोलिस कॉन्स्टेबल शोभा न्याहळदे या पथकाने संशयित आरोपी अनिल रघुनाथ भोई यांच्या घराची शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झडती घेतली. या झडतीत त्याच्या घरातून गावठी बनावटीचा कट्टा, ३ जीवंत कडतुस आणि लोखंडी तलवार आढळून आले. संशयित आरोपी अनिल भाऊ याला ताब्यात घेतले असून तलवार, गावठी कट्टा आणि कडतुस हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.