जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – पाचोरा रस्त्यावर असलेल्या वावडदा परिसरातील एका शेतात मध्यरात्रीच्या सुमारास शेताची रखवाली करीत असलेल्या ५२ वर्षीय पांडुरंग पंडित पाटील यांचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी ट्रॅक्टर देखील लांबवले होते. पहाटे घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक करत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास या खुनाच्या घटनेची उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव (चार्ज) ऋषीकेश रावले यांनी एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ हा गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते. त्यानुसार किसन नजनपाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, सफो विजयसिंग पाटील, पोह जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बिलवाडी ता. जि. जळगाव येथे जावून घटनास्थळाची पाहणी केली असता, घटनास्थळी मिळालेले पुरावे गोपनीय माहिती तसेच परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे मालक राजेंद्र ईश्वर पाटील (रा. बिलवाडी) यांच्याकडील सालदार पवन बहाधीर बारेला याच्यावर संशय बळावला होता. कारण मालकास विचारपुस करता मालकाने पवन बारेला हा त्याचे कुटुंब व शालकासह त्याचे सासरवाडी सालीकला (सालीतांडा) ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र. येथे गेल्याचे समजले.
त्यामुळे पथकाने सदर गावी जावून त्याचा शोध घेतला असता पवन बारेला व त्याचे सोबत एक इसम हा मिळून आला. दोघांची विचारपूस केली असता पवन बहाधीर बारेला (वय ३०, वाघाड ता.राजापूर जि. बडवाणी) व बाधरसिंग शोभाराम बारेला (वय २४, रा.सानीकल (सालीतांडा) ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र), असे सांगीतले. त्यावेळी पवन बारेला यास त्याचा मालक राजेंद्र ईश्वर पाटील यांच्या खळयात झालेल्या घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी व माझा शालक अश्यांनी मालकाचे ट्रॅक्टर चोरी करण्याचे ठरवून पुन्हा बिलवाडी ता. जि. जळगाव येथे येवून मालकाचे खळयातून ट्रॅक्टर चोरी करायला गेले होते. यावेळी तिथे झोपलेला रखवालदार पांडुरंग पंडीत पाटील हा उठून त्यांना विरोध करू लागला. त्यामुळे तिथे असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली जाइन्ट करण्याचे अवजड लोखंडी डाबरने रखवलदार पांडुरंग पाटील याच्या छातीत व डोक्यात मारून ठार करून तेथून ट्रॅक्टर घेवून निघुन गेलो. परंतु रस्त्यात ट्रॅक्टर बंद पडल्याने ते तिथेचे सोडून माझ्या मोटार सायकलने पुन्हा माझ्या सासरी सालीतांडा येथे निघून आलो होतो, अशी हकिगत सांगीतली . यामुळे पवन बारेला आणि वाधरसिंग बारेला या दोघांना ताब्यात घेवून त्यांना एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ या गुन्ह्यांचे पुढील तपासकामी वैद्यकिय तपासणी करून गुन्ह्याचे पुढील तपासकामी एमआयडीसी पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.