नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रत्येक घरात पाल पाल आणि झुरळ असतात पण घरातील काहीना हे पाहिले कि घाम फुटत असतो. मग विचार करा जर तुमच्या घरात एखादा छोटासा कीटक नव्हे तर भलामोठा किंग कोबरा असेल तर. आपल्यापैकी अनेकांना हे वाचूनच भीती वाटली असेल ना ? साप हा असा सरपटणारा प्राणी आहे,जो कधीही कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एक भलामोठा साप चक्क एका किचनच्या सिलिंगमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो चक्क किंग कोब्रा आहे. एवढा भयंकर साप किचनच्या वर असलेल्या सिलिंगमध्ये गेलाच कसा असा प्रश्न प्रत्येकाला पडलाच असेल. परंतू हे खरं आहे. सिलिंगमध्ये लपून बसलेल्या किंग कोब्राची तरुणीने सुरक्षितरित्या सुटका केली आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी किचनवर उभी आहे. त्यानंतर ती किचनच्या सिंलिगमध्ये लपून बसलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न करत आहे. सापाला काढण्यासाठी ती एका लांब काठीचा वापर करत आहे. अथक प्रयत्न करुन ती सिंलिगमध्ये लपलेल्या सापाला काढण्यात यशस्वी होते. मग आपल्या हातात भल्यामोठ्या सापाला पकडून ती सुखरुप किचनवरुन खाली उतरते. विशेष म्हणजे या तरुणीच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती दिसत नाही. मात्र व्हिडीओ बघणाऱ्या नेटकऱ्यांना भीती नक्कीच वाटली असणार हे मात्र खरं.
व्हायरल व्हिडीओ हा @sunshinecoastsnakecatchers या इन्स्टांग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडीओ पोस्ट होताच जोरदार व्हायरल झाला आहे. सदर घटना ऑस्ट्रेलियातील आहे. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यात एका यूजरने लिहीलं आहे की,’ ही तरुण आणि धाडसी आहे. व्हायरल व्हिडीओला लाखोच्या घरात व्हूज मिळाले आहेत.