• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेत वडापाववरून वाद प्रवाशी पोहचला थेट रुग्णालयात !

editor desk by editor desk
November 16, 2023
in क्राईम, रावेर
0
रेल्वेत वडापाववरून वाद प्रवाशी पोहचला थेट रुग्णालयात !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ रेल्वेमधील प्रवासादरम्यान झालेल्या छोट्या मोठय भांडणाचे व्हायरल होत असतांना नुकतीच एक घटना छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रेनमधील समोर आलीय. ट्रेन लातूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आली असता खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीसोबत वडापाववरून वाद झाला. मात्र, हा वाद त्या प्रवाशाला चांगलाच महागात पडला. त्या प्रवाशाला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालाजी दिगंबर जानोळे असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.

बालाजी दिगंबर जानोळे हे आपली पत्नी मुक्ता जानोळे आणि दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून हैदराबादला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले होते. ही ट्रेन लातूर जिल्ह्यातील तिच्या रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी मुलांनी खाऊ मागितला. त्यामुळे जानोळे यांनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीला काही विचारले. तोपर्यंत गाडी सुटली आणि तो विक्रेता गाडीत चढला. त्याने जानोळे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली. वादाचे कारण अगदीच किरकोळ होते.
जानोळे यांच्यासोबत वाद घालणाऱ्या त्या विक्रेत्याने त्यांना थेट चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. यानंतर कोचमध्ये एकच गोंधळ उडाला. ही घटना घडली त्यावेळी जानोळे यांची पत्नी आणि दोन मुलेही सोबत होती. पत्नीने आधी आरडाओरड केली. मात्र, प्रसंगावधान राखून तिने तत्काळ ट्रेनची चेन ओढून ट्रेन थांबवली.

पत्नी मुक्ता हिने आपल्या मुलांसह ट्रेनमधून खाली उतरली. तेव्हा तिला पती बालाजी गंभीर जखमी होऊन रुळाच्या बाजूला पडलेले दिसले. तोपर्यंत साखळी कुणी खेचली हे पाहण्यासाठी आरपीएफचे जवान पोहोचले होते. त्या जवानांच्या साह्याने पत्नी मुक्ता हिने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

पत्नी मुक्ता हिने दिलेल्या माहितीच्या आधारे आरपीएफने खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जानोळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला आणि शरीराच्या इतर भागावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत.

आपल्या पतीला धक्काबुक्की करणाऱ्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी पत्नी मुक्ता जानोळे यांनी केली आहे. तिच्या पतीला चालत्या ट्रेनमधून फेकणाऱ्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई कारवाई अशी मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान, आरपीएफने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरपीएफ स्टेशनचे प्रभारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे असे सांगितले.

Previous Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना व्यवसायात नफा होईल

Next Post

पैसे देण्यास टाळाटाळ : नागपुरात दोघांनी केली भाजप पदाधिकाऱ्याची हत्या !

Next Post
पैसे देण्यास टाळाटाळ : नागपुरात दोघांनी केली भाजप पदाधिकाऱ्याची हत्या !

पैसे देण्यास टाळाटाळ : नागपुरात दोघांनी केली भाजप पदाधिकाऱ्याची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group