Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नोकराने केली मालकीनीवर जबरदस्ती ; तिने थेट प्रायव्हेट पार्टचा कापला !
    क्राईम

    नोकराने केली मालकीनीवर जबरदस्ती ; तिने थेट प्रायव्हेट पार्टचा कापला !

    editor deskBy editor deskNovember 15, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरात अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या घरात काम करणाऱ्या नोकरावर बळजबरीनं घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. नोकराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यावर स्वरक्षणासाठी महिलेने चाकूने नोकराचा प्रायव्हेट पार्ट कापला. ज्यामुळे नोकर गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या नोकराची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना चादर आणि उशी रक्ताने माखलेली दिसली. पोलिसांनी चाकू जप्त केला. मात्र पोलिसांनी पीडित महिलेच्या जबाबानंतर तिच्याविरोधातच गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे. ही घटना मंझनपूरच्या शरीफपूर गावातील आहे. इथं राहणाऱ्या एका महिलेचा पती सौदी अरबमध्ये कामाला आहे. तिच्या घरी नोकर कामाला आहे. मागील काही दिवसांपासून नोकराची नियत बदलली होती असा आरोप आहे. जेव्हा महिलेच्या घरी कोणी नव्हते तेव्हा नोकराने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

    परंतु महिलेनं स्वत:च्या बचावासाठी किचन बंद करण्याचा बहाणा करून तिथून चाकू घेऊन आली. त्यानंतर नोकर जसा तिच्या जवळ आला तसा तिने चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. चाकूच्या हल्ल्याने नोकर गंभीर जखमी झाला आणि तिथून पळ काढला. त्यानंतर महिला थेट पोलीस ठाण्यात पोहचली तिथे तिने घडलेला प्रसंग सांगितला. जे ऐकून पोलिसांना धक्का बसला, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. परंतु पोलिसांनी जखमी नोकराच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधातही गुन्हा नोंद केला. त्यासोबत तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

    २३ वर्षीय जखमी नोकरानं दावा केला की, मी महिलेच्या घरी लहानपणापासून काम करतोय. घटनेच्या दिवशी महिलेने मला तिच्याजवळ बोलावले. त्यानंतर माझ्या तोंडावर रुमाल बांधून मला बेशुद्ध केले. त्यानंतर प्रायव्हेट पार्ट कापला. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला वेदना झाल्या. त्यानंतर कसंतरी मी तिथून पळ काढून घरी आलो आणि तिथून मला हॉस्पिटलला आणण्यात आले. तर महिलेने म्हटलं की, मी घरात एकटीच होते. तेव्हा नोकर हसत हसत घरात शिरला. त्याने माझा हात पकडला आणि खोलीत घेऊन जात होता. जेव्हा मी त्याला हात सोडायला सांगितला तेव्हा त्याने बळजबरी केली. मग मी बहाणा बनवत किचनमध्ये गेली, तिथून चाकू घेऊन आली. त्याने ऐकलं नाही शेवटी मी बचावासाठी त्याच्यावर चाकू हल्ला केला.

    दरम्यान या प्रकरणी डीसीपी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. शरीफपूर इथं एका मुलाचे त्याच्या शेजारील महिलेसोबत वाद झाला होता. ज्यात महिलेने मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात पाठवले. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. महिलेला ताब्यात घेत हल्ल्यातील चाकूही जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी म्हटलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.