जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीसह विवाहितेचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना पाड्व्याच्या दिवशी भर रस्त्यावर एका २१ वर्षीय योगा शिक्षिका असलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २१ वर्षीय योगा शिक्षिका दि.१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिंप्राळा उड्डाणपूलनजीक ब्युटी पार्लरची ओर्डर करण्यासाठी जात असतांना संशयित आरोपीने तिच्या जवळ येत मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिचा हात पकडला, यासह तिच्याशी चुकीचे वर्तन केल्याने तरुणीला लज्जा उप्तन्न झाली यासह तिला शिवीगाळ करीत तिच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी तरुणीने थेट रामानंद नगर पोलिसात धाव घेत विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.राजेश चव्हाण हे करीत आहेत.