• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील  भूमापकाचा मृत्यू

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 3, 2021
in Uncategorized
0
विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील  भूमापकाचा मृत्यू



लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय-५२ )  यांनी वरिष्ठांच्या जांचाला २३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता .आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात एम.एस. पदावर काम करतात. खडका येथून ते दररोज दुचाकीने अपडाऊन करत होते. सन २०१९ पासून त्यांना वरिष्ठांकडून कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून तणावात काम करत होते.  हा त्रास सहन न झाल्याने संजय पाटील यांनी ऑनड्यूटी कार्यालयात विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एरंडोल येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने १ डिसेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होतो. शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी १२. १५ वाजेच्या सुमारास संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय पाटील यांनी मृत्यूपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलीसांच्या ताब्यात आहे. त्यात म्हटले आहे की, व्ही. एन. पाटील, व्ही.एल. सोनवणे, आर. व्ही. जाधव आण ठाकूर या चार अधिकाऱ्यांच्या जांचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

या घटनेमुळे संजय पाटील यांची पत्नी रजनी, मुलगा प्रशांत आणि शालक शांतराम पाटील यांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला होता. संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांसह नातेवाईकांनी घेतला आहे.

Previous Post

जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

Next Post

गावठी कट्टा व काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Next Post
गावठी कट्टा व काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

गावठी कट्टा व काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group