पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठय कारणावरून नेहमीच वाद निर्माण होत असतो पण तो वाद टोकाला कधी जाईल हे मात्र सांगता येत नसते. अशीच एक घटना धक्कादायक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे. दुकानदाराला मला उधारीवर सामान देऊ नको असे का सांगितले, याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून बिल्डिंगच्या टेरेसवरुन ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून हा प्रकार सोमवारी दि.१३ रात्री बाराच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी सोसायटीमध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील बैजु लक्ष्मी मंडल (वय-३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शंभु दपी राम (वय-47 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मृत बैजु याचा मित्र संतोष कोंडीबा गिनलवाड (वय-32 रा. संजय गांधी सोसायटी, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत व्यक्ती, फिर्य़ादी व आरोपी हे एकाच ठिकाणी राहतात.
सोमवारी रात्री फिर्य़ादी यांचा मित्र बैजू आणि आरोपी शंभु यांच्यात वाद झाला. बैजू याने शंभू याला ‘मला उधारीवर माल देऊ नकोस असे दुकानदाराला का सांगितले’ याचा जाब विचारला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपी शंभु राम याने बैजू मंडल याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बिल्डिंगच्या टेरेसवरुन खाली ढकलून दिले. यामध्ये गंभीर जखमी होऊन बैजु याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.