Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भयंकर अपघात : ६ जिवलग मित्रांचे कारचा पत्रा कापून काढले मृतदेह !
    क्राईम

    भयंकर अपघात : ६ जिवलग मित्रांचे कारचा पत्रा कापून काढले मृतदेह !

    editor deskBy editor deskNovember 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तरप्रदेशात एक भयानक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुझफ्फरनगर परिसरात घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की सहाही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिवम त्यागी, परश शर्मा, कुणाल शर्मा, धीरज, विशाल आणि त्याचा मित्र, अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहदरा परिसरातील रहिवासी होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते बाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर छपरजवळ त्यांच्या कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.