जळगाव : प्रतिनिधी
मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अलोक भास्कर कोळी (वय २१, रा. भोकर) व त्याचा मित्र दीपक याला चौघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना शुक्रवारी रोजी भोकर गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भोकर गावातील अलोक कोळी हा तरुण शुक्रवारी दुपारच्या सुमारास अलोक हा त्याचा मित्र दीपक सोबत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी अलोकने गावातील एका जणाला दीपकला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला. याचा राग आल्याने गावातील चार जणांनी दोघांना लाठ्या काठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अलोक कोळी याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण आगोणे करीत आहेत.