हार्मोनिका वादन, गीतगायनाने आली कार्यक्रमात रंगत
जळगाव – भुसावळ येथील सर्जन डॉ.आशुतोष केळकर आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुजाता केळकर हे दाम्पत्य आता पुण्याला स्थायिक होत असल्याने गोदावरी फाऊंडेशनतर्फे हृदयस्पशी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मोमेन्टो देवून सन्मानित करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात मंगळवार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी हृदयस्पर्शी निरोप समांरभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.सुरेंद्र भिरुड हे होते. व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डी.एम.कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, डीयुपीएमसीचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन, दिपप्रज्वलन करण्यात आले. पुष्पगुच्छ देत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गौरी जोशी, कल्याणी कुळकर्णी ह्यांनी डॉ.आशुतोष केळकर ह्यांचा शालेय जीवनापासून ते आतापर्यंतचा आयुष्याचा प्रवासाचे वर्णन केले.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर ह्यांनी डॉ.आशुतोष केळकर व डॉ.सुजाता केळकर ह्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोमेन्टो, सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले. याप्रसंगी गायनप्रेमींनी विविध हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण तसेच केळकर दाम्पत्याच्या हार्मोनिका वादनाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
याप्रसंगी डीन डॉ.एन.एस.आर्विकर ह्यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी डॉ.सुरेंद्र भिरुड यांनी डॉ.आशुतोष केळकर यांच्या स्वभावाचे वर्णन करत हार्मोनिका शिकण्याची प्रेरणाही केळकरांकडून मिळाल्याचे सांगितले. डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले आणि आज प्रत्यक्षात भेटण्याचा आणि हार्मोनिका लाइव्ह ऐकण्याचा योग आल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हास पाटील यांनी केळकर दाम्पत्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, भुसावळ येथील डॉ.दिनेश नेहते, डॉ.प्रसन्ना जावळे, डॉ.जान्हवी, हृदयालयातील डॉ.प्रदिप देवकाते, आर्थोपेडिक डॉ.दिपक अग्रवाल, ईएनटीच्या डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, मेडिसीन तज्ञ डॉ.पाराजी बाचेवार, डॉ. कल्पना बाचेवार, पॅथॉलॉजीच्या डॉ.नेहा वझे, बालरोग तज्ञ डॉ.विजय गरकल, डॉ.उमाकांत अणेकर, दंतरोग चिकित्सक डॉ.प्राची बोबडे आदि डॉक्टरांची उपस्थीत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौरी जोशी, कल्याणी कुळकर्णी यांनी केले. अन्नपूर्णालयाचे प्रमुख डी.टी.राव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, सईद बशीद, ग्रंथपाल गोपाल भोळे, संगणक विभागाचे भुषण चौधरी यांच्यासह डीयुपीएमसीचे कर्मचारी वृंदानी सहकार्य केले.