Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिवाळीनिमित्त गावी येत असतांना रस्त्यात भीषण अपघात : दोन पुरुषासह एक महिलेचा मृत्यू !
    क्राईम

    दिवाळीनिमित्त गावी येत असतांना रस्त्यात भीषण अपघात : दोन पुरुषासह एक महिलेचा मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था

    राज्यात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण सुरु असतांना अपघाताच्या देखील घटना घडत आहे. अशीच एक घटना अहमदनगर तालुक्यातील चास शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिलेचा मृत्यू झाला तर इतर १२ जण जखमी झाले आहेत. हे सर्व बीड व धाराशिव जिल्ह्यातील आहेत.

    दिवाळीच्या निमित्ताने नगरमार्गे ते पुण्याहून बीडला गावाकडे जात असताना शनिवारी पहाटे ४.४० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. चास शिवारात एका पेट्रोल पंपासमोर एक कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी थांबली. त्यामागे पिकअपही (एमएच १२, एलटी ३९१३) येऊन थांबली. त्यानंतर मागून आलेल्या खासगी बसने (एम.एच.४३ बी.पी. ८४३५) पीकअपला धडक दिली. यात पीकअप मधील तिघांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले. बस चालकही जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले. पीकअप उभ्या कारचेही अपघातात नुकसान झाले. माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.

    या अपघातात मयतमध्ये सारिका मच्छिंद्र कागदे, प्रवीण गोरख कागदे (वय २६, दोघे रा. मोरगाव, जि. बीड), दीपक चव्हाण (रा. पखरूड, ता. भूम, जि. धाराशिव) तर या मध्ये सूरज बजरंग कागदे (वय १८), बजरंग शेषराव कागदे (चालक), धीरज मच्छिंद्र कागडे (वय १७), मच्छिंद्र शेषराव कागदे, राहुल गोरख कागदे (वय २३), सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे (वय ९), आरती प्रवीण कागदे (वय २१), आरती बजरंग कागदे (वय १५), श्रुती मच्छिंद्र कागदे (वय १४, सर्व रा. मोरगाव, जि. बीड), धीरज राजाभाऊ जोगदंड (रा. पिंपळगाव, ता.वाशी, जि. धाराशिव) हे जखमी झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.