Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीच्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार !
    क्राईम

    चारचाकीच्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार !

    editor deskBy editor deskNovember 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या कार अपघातांत तीन दुचाकीस्वार ठार झाले. या अपघातात एक जण जखमी झाला असून, याप्रकरणी म्हसरूळ, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील परशराम सीताराम शेखरे (वय ३४, रा. कोकणगाव बु., ता. दिंडोरी) हे सोमवारी (दि. ६) रात्री आपल्या दुचाकीवर दिंडोरी रोडने प्रवास करत असताना हा अपघात झाला. करी लिव्हज हॉटेल समोरून ते प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या विंगर कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेखरे यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार हिरामण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक राकेश पाटील (रा. विजयनगर, सिडको) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत. दुसरा अपघात लेखानगर भागात झाला. गणेश भाऊराव डुंबरे (वय २८, रा. शिवपुरी चौक, पंडितनगर) व ज्ञानेश्वर विक्रम कटारे (वय २७, रा. मोरवाडी, सिडको) हे दोघे मित्र मंगळवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास लेखानगर येथील स्टेट बँक चौकातून आपल्या दुचाकीवर जात असताना हा अपघात झाला. आशा सोनोग्राफी सेंटरसमोर भरधाव एमएच १५ एफएन ०७६९ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात डुंबरे याचा मृत्यू झाला, तर कटारे जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत हवालदार नितीन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक शिरवले करीत आहेत. तिसरा अपघात सातपूर औद्योगिक वसाहतीत झाला.

    या अपघातात संदीप दिलीप गायकवाड (वय ३४, रा. महालक्ष्मी चौक, सातपूर) हा दुचाकीस्वार ठार झाला. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.४) औद्योगिक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला होता. बॉश कंपनीजवळील हेमल इन्फोट्रॉनिक्स या कारखान्यासमोरून तो दुचाकीवर घराकडे जात असताना भरधाव आलेल्या एमएच ०५ एक्यू ४२८८ या क्रमांकाच्या बलेनो कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड याचा मृत्यू झाला असून, याबाबत अंमलदार आर. एस. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.