लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत महाविकासआघाडी च्या कोअर कमिटीने ठरविल्या प्रमाणे राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे विराजमान झाले असून उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांच्या वर्णी लागली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत महा विकास आघाडीने वीस जागांवर विजय मिळवला यात 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या त्यामुळे बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे वर्चस्व आधीच प्रस्थापित झाले होते त्यात महा विकास आघाडीच्या कोर कमिटीने झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची साठी कोणाला किती संधी मिळणार याचा निर्णय घेण्यात आला होतात या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्षे अध्यक्ष पद मिळणार असून तर उपाध्यक्षपदी शिवसेनेला दोन वर्ष काँग्रेसला दोन वर्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला एक वर्ष असे पद मिळणार आहेत आज जिल्हा बँकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साठी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांना संधी देण्यात आली.