• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुसाट चारचाकीने सहा गाड्यांना दिली जोरदार धडक ; तीन ठार तर सहा जखमी !

editor desk by editor desk
November 10, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
सुसाट चारचाकीने सहा गाड्यांना दिली जोरदार धडक ; तीन ठार तर सहा जखमी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना मुंबई शहरातील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर एक भीषण अपघात गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना भरधाव कारने मागून येत जोरदार धडक दिली आहे. हि घटना रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कारने सी लिंकवरून जात असलेल्या एका कारला धडक दिली. अपघातानंतर इनोव्हा कारच्या चालकाने कार दामटवली. वेग जास्त असल्याने इनोव्हा कारने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ६ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा देखील समावेश आहे. अपघातानंतर वांद्रे सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. रात्री उशीरापर्यंत कारचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

जाणून घ्या! धनत्रयोदशीची कथा व मान्यता

Next Post

तब्बल आठ वर्षांनी कारच्या मिररने समोर आली धक्कादायक माहिती !

Next Post
तब्बल आठ वर्षांनी कारच्या मिररने समोर आली धक्कादायक माहिती !

तब्बल आठ वर्षांनी कारच्या मिररने समोर आली धक्कादायक माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
राजकारण

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 14, 2025
खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !
कृषी

खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !

June 14, 2025
मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group