जळगाव : प्रतिनिधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बकालेला गुरुवारी बजावले आहे. तपासधिकाऱ्यांनी न्यायायालकडे बकाले याला फरार घोषीत करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बकाले याला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.
मुख्यन्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पकड़ ऑर्डरला स्थगिती मिळावी यासाठी बकाले याने मुख्यन्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि. ७ नोव्हेंबर रोजी पत्र दाखल केले होते. त्याला स्थगिती मिळावी बकाले याने न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने तपासधिकाऱ्यांचा खुलासा मागविला होता. परंतु यावर हरकत घेतली जाईल म्हणून बकाले याने दुसऱ्या दिवशी न्यायायालयात सादर केलेला अर्ज वकीलांमार्फत मागे घेतला. या संपूर्ण बाबीची माहिती मिळाल्यानंतर महिलांतर्फे भूमीका मांडणाऱ्या अॅड. गोपाळ जळमकर व अॅड. कुणाल पवार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून अर्जाची नक्कल प्राप्त केली. त्यानंतर बकालेच्या अटकपूर्व जामीनावर जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज झाले. त्यावेळी ती न्यायालयाकडे सादर करुन तीबाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.