पारोळा : प्रतिनिधी
एका ४३ वर्षीय प्रौढाचा दि.७ रोजी पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील इंदाशी धरणात घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील अशोक जाधव (वय ४५) रा वसंतनगर हे दि.७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी चाललो असे सांगून गेले होते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने गावातील मंडळी व परिवाराचे सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही आढळून आले नाही. मात्र आज दि.९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळकोठा शिवारात असलेल्या इंदाशी धरणात त्यांचा मृत्यू देह पाण्यात तरंगताना आढळून आला, त्यांचा पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली या प्रकरणी पारोळा पोलिसात सुनील जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.