लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथील राहणाऱ्या युवकाने आपल्या पत्नीला तोंडी तलाक दिला होता.याच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून पतीचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, चोपडा येथील मुस्तफा कॉलनीतील रहिवासी रईसोद्दीन रफीयोद्दीन जहागीरदार याचा जुलै २०१९ मध्ये एका तरुणी सोबत विवाह झाला होता. विवाह होऊन तीन वर्षा झाले होते रईसोद्दीने आपल्या पत्नीला माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला. यानंतर त्याने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन तिच्या माहेरी पाठवून दिले. या अनुषंगाने संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून रईसोद्दीन आणि त्याच्या आईच्या विरोधात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रईसोद्दीन याच्या आईला चोपडा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्याचा अर्ज मात्र फेटाळला आहे.