Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉटेलमध्ये आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह !
    क्राईम

    हॉटेलमध्ये आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह !

    editor deskBy editor deskNovember 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडत आहे. यात अनेक महिलासह तरुणाचे मृतदेह आढळल्याच्या देखील घटना घडत असतांना अशीच एक बातमी दिल्लीतील एका हॉटेलमधून समोर आली आहे. एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर समोर जी माहिती आली, ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं मृतांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेल्या मृत आयशाचे मेरठ येथील रहिवासी असलेल्या सोहराब (वय २८) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. २७ ऑक्टोबर रोजी दोघांनी एका हॉटेलमध्ये ४ तासांसाठी रुम बुक केली. मात्र, ४ तास उलटूनही दोघे बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्या रुमचा दरवाजा ठोठावला. आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, दोघांचेही मृतदेह रुममध्ये आढळून आले.

    पोलिसांना दोघांजवळ एक सुसाईट नोट सापडली होती. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय होता. या प्रकरणात पोलिसांनी आयशाच्या पतीची चौकशी केली. आपण सोहराब याला ओळखत नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. बुधवारी दोघांचाही पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये आयशाची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. तर सोहराब याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, असं समोर आलं आहे. सोहराब याने आधी आयशाची हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणात अजून काही माहिती हाती लागते का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.