बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापडा बनला असून नेहमीच या महामार्गावर अपघात होत आहे. तर नुकतेच समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरच्या दिशेने गणराज ट्रॅव्हल्सची बस जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी प्रवास करत होते.