अध्यक्षपदी तीन वर्ष राष्ट्रवादी या दोन वर्षे शिवसेना
फॉर्म्युला ठरला
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या असून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 21 पैकी 20 संचालक महा विकास आघाडीचे आले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेला संधी राहील तर उपाध्यक्षपदी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत नुकतीच निवडणूक पार पडली यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत महा विकास आघाडीचे 20 संचालक निवडून आले आहेत आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे शिवसेनेकडून पालक मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तीन वर्ष तर शिवसेनेकडे दोन वर्ष राहणार असून उपाध्यक्षपदी काँग्रेसला दोन वर्ष शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला एक वर्ष असे विभागून मिळणार आहे सर्वप्रथम राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी कोण असणार याबद्दल खडसे यांनी बोलणे टाळले.
आज महा विकास आघाडीचे कोअर कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरून पोहोचला 20 महिन्याचा फॉर्मुला खडसेंना मान्य नसल्यामुळे तसे न करता तीन वर्ष राष्ट्रवादीला दोन वर्ष शिवसेनेला अध्यक्षपद देण्यात आले तर उपाध्यक्षपदी प्रथम शिवसेनेला त्यानंतर काँग्रेसला व सर्व शेवटी एक वर्ष राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहेत असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रदीप पवारानी सांगितले