बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील कडा तलावातील झुडपात आठ महिन्यांपूर्वी (६ एप्रिल) मच्छिमारांना पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. पोलिसांनी वर्षभर तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. तपासाअंती दोन मित्रांच्या मदतीने मुलाने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील आरोपींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात मच्छिमारांना ६ एप्रिल रोजी सकाळी बेशरमाच्या डादपातसांगाडा आढळून आला होता… पोलिसांनी पंचनामा केला असता ५५ ते ६० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. नोव्हेंबर– डिसेंबर २०२२ या काळात लक्ष्मण सदाशिव शेंडे यांचा खून झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. मुलाने मित्राच्या मदतीने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तलावात फेकून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी मुलासह एका मित्राला ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. अशोक लक्ष्मण शेंडे (३८),रामवीर यादव, किरण वाघमारे अशी आरोपींची नावे आहेत