नाशिक : वृत्तसंस्था
शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथे एसटी न बसच्या चाकाखाली सापडून एका ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.७) सकाळी न पावणेदहाच्या सुमारास घडला.
मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे (वय ९) हा घराकडून मळेगावकडे सायकलवर जात असताना म्हस्के यांच्या वीटभट्टीसमोर त्याच्यासमोरून रिक्षा जात होती, रिक्षाला ओव्हरटेक ” करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या (क्र. एमएच ४० वाय ५४२८) या शेवगाव- राहुरी बसच्या चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकून तो फेकला जाऊन तो बसच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला.
अपघतानंतर बसचा चालक पसार झाला. यावेळी रस्त्यावर मोठा जमाव जमला होता. शेवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह उतरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. श्लोक हा मळेगाव येथीलकर्डिलबा वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ३ रीमध्ये शिकत होता. त्याचे वडील सोलापूर येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत शेवगाव आगाराचे चालक शहादेव लक्ष्मण गोरे (वय ५१, रा. जोहरापूर, ता. शेवगाव ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्लोकच्या अपघाती निधनाने मळेगाव गावावर शोककळा पसरली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्यासह पोलीस नाईक संदीप आव्हाड, चालक संभाजी धायतडक, सुधाकर दराडे, होमगार्ड दगड खैर यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला आहे.